५ ते ६ वेळ २०१८ – २०१९

जून २०२०

२८ जून

वाचणे, क्रियापदांचा मूळ अर्थ सांगणे आणि वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात वापर करणे.

यशची बडबड खूप 
आवाज येतो, “चूप” 
कोणाचा हा आवाज?
बाबाचा!

अनया सारखी खेळते
जेवायचं विसरते!
भूक, भूक, भूक
कोणाचा हा आवाज?
अनयाचा!

श्रेया सतत झोपते
ऊठ, ऊठ, ऊठ
कोणाचा हा आवाज?
आईचा!

अर्थव ढकलतो यशला
बास, बास, बास
कोणाचा हा आवाज?
काकाचा!

बडबडणे – यश ब॒डबडतो, यश बडबडला, यश बडबडेल.
खेळणे – अनया खेळते, अनय खेळली, अनया खेळेल.
झोपणे – यश झोपतो, अनया झोपली, अनया झोपेल

२१ जून 

दोन पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी शब्द लिहा. अनेकवचन लिहा.
उदाहरणार्थ – ती नदी – त्या नद्या, ते पाणी – ते पाणी, तो पंखा – ते पंखे.

एकाच शब्दाचे दोन अर्थ सांगा
मान – आदर (Respect), मान (Neck)
परत – परत (Again), पोळी परत (Flip), वस्तू परत करणे (Return)
पाठ – पाठ (back), पाठ (memorized), अडचणीत पाठ फिरवणे (Turning back)
डोळा – डोळा (eye), डोळा असणे,

विरुद्ध अर्थ सांगा.
प्रश्न – उत्तर
जड – हलकं/ हलके
कठीण – सोपं/सोपे

१४ जून 

दिलेल्या शब्दांतून योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरणे. वापरलेल्या शब्दांतून गोष्ट तयार करणे.
कपाटात, झाडावर, कपाट, झाड,
ते कपाट आहे.
ते झाड आहे.
त्या झाडावर कावळा आहे.
त्या कपाटात ठेव.

गोष्ट
एक होती बाई. बाईचे नाव मोहना होतं. मोहनाला सफरचंद हवं होतं. कावळा कपाटातून ओरडत होता. मोहना घाबरली. मोहनाने कपाट उघडलं. कावळा घाबरला. त्याने सफरचंद घेतलं आणि तो उडून गेला. कपडे पायात अडकले. कावळा कपड्यांमध्ये अडकला. तो खाली पडला. मोहनाने त्याचं सफरचंद खाल्लं.

७ जून 

चित्र ओळखून लिंग सांगणे आणि लिहिणे.
तो, ते, ती
मासा, ससा, उशी, नदी, केळे, तेल.

मे २०२०

१० मे 

नेणे, घेणे, देणे, करणे याचा सर्वनामांबरोबर वापर.
उदा. मी नेते, ती नेते, तो नेतो,तू नेतेस, ते नेतात, आपण नेतो.
गोष्ट तयार करणे.
एक मुलगी होती. तिचं नाव मोना होतं. मोनाला केळी खायला आवडतात. तिने झुम केलं. तिची मैत्रीण झुमवरती होती. ती झुमच्या शाळेत होती.

३ मे 

आधी सोपी सोपी वाक्य वाचणे. लिहिणे. नंतर त्यात सर्वनाम, उभयान्वयी अव्यय,जोडाक्षरं वापरणे.
१ दार उघड.
२ काका आला.
३ काका बसला. – तो बसला.
४ काका बोलत बसला. – तो खुर्चीवर बोलत बसला.
५ काकाने हात धुतले. – त्याने हात धुतले
६ काका जेवला.- काका टेबलावर जेवला.
७ काका झोपला. – काका पलंगावर झोपला. काका खोलीतल्या पलंगावर झोपला.
८ काका गेला. – काका त्याच्या घरी गेला.


एप्रिल २०२०

२६ एप्रिल

इंग्रजी शब्दांचा अर्थ सांगून मराठीत लिहिणे
You – तू
This – हे
That – ते
Me – मी
She – ती
He – तो
We – आपण/आम्ही
They – ते
Do – कर
Hold – धर
Catch – पकड
Bring – आण
Give – दे
Take – घे
Hot – गरम
Boil – उकळ
Stir – ढवळ
Flip Over – परत

१९ एप्रिल

मुलानी तयार केलेली गोष्ट
एक होती बाहुली
ती मोठया घरात बसते.
एकदा एका मुलीने तिला उचललं
ती मुलगी बाहुलीबरोबर खेळत होती
खेळताखेळता पडली.
आणि तुटली.

शा/श्या चा वापर
तो डोसा – डोशाची चटणी
तो मासा – माशाची आमटी
तो ससा – सशाचे कान
ती बशी – त्या बश्या
ती उशी – त्या उश्या

१२ एप्रिल

लेखन, वाचन
सुई, सुरी, फुकट – र्‍हस्व उकारान्त शब्द
तूप, भूक, कडू – दीर्घ उकारान्त शब्द
केस, केर, खेळ – मात्रा असलेले शब्द

वाचन करून क्रम काय असू शकतो ते सांगणे.
१. मी खेळले.
२. मी उठले.
३. मी झोपले.
४. मी जेवले.
५. मी दात घासले.

५ एप्रिल

वाचणे आणि लिहिणे. प्रत्येक मुळ शब्दात काना, वेलांटीमुळे होणारा फरक.

ढग, रस, जड – अकारान्त शब्द

मान, हात, दात – आकारान्त शब्द

दिवा, किडा, दिशा – इकारान्त र्‍हस्व शब्द

मीठ, काकडी, नीट – इकारान्त दीर्घ शब्द

गोष्ट:
विराज नावाचा मुलगा असतो. त्याच्या घरी इस्त्रीचे कपडे घेऊन येणार्‍या मुलाबरोबर त्याला खेळायचं असतं. मुलाला वेळ नसतो कारण त्याला त्याच्या बाबांना मदत करायची असते. त्याला खेळणं हा शब्दच ठाऊक नसतो आणि तो सरकारी शाळेत जात असतो. विराजला त्याची आजी त्याला जसं खेळ शिकवायला सांगते तसंच असं काही त्याला शिकवायला सांगते की ते त्याच्याकडे कायमचं राहिल आणि उपयोगी पडेल. यातून विराजला एक कल्पना सुचते. विराज त्याला गणितात शिकवायचं ठरवतो.


मार्च २०२०

२९ मार्च
वाचन लेखन

वर, चढ, पटपट, रड, उघड, लप, उतर हे शब्द लिहिणे.
मी जाते/जातो, ती जाते, ते जातात, तू जातोस, तुम्ही जाता, आपण जातो, आम्ही जातो. वाचून दाखवून काळ सांगणे.
खरा मित्र गोष्ट:
एका जंगला कोल्हा आणि हरीण राहत असतं. कोल्हा रोज विचार करत असे, “या हरणाला मारून खाऊ या.” पण तो हरणाप्रमाणे वेगाने धावू शकत नव्हता.
कोल्ह्याला युक्ती सुचली. तो रडायला लागला. हरिणाने कारण विचारले. तो म्हणाला,
“मला कुणी मित्र नाही. मला जीव द्यावासा वाटतो.” हरिणाने त्याचं मित्र व्हायचं मान्य केलं.
हरिणाने कावळ्याशी कोल्ह्याची ओळख करून दिली. कावळा म्हणाला,
“तुझी कोल्ह्याशी ओळखही नाही आणि लगेच तो मित्र झाला. थोडी ओळख करून घे आधी.” हरीण विचारात पडले. कोल्हा म्हणाला,
“मैत्री झाल्यानंतरच ओळख होते.” कावळ्याला पटले नाही.
कोल्हा हरणाला शेतात घेऊन जायला लागला. तिथे खाऊन, खेळून सगळी नासाडी झाली. शेतकर्‍याने जाळं लावलं. शेतकर्‍याच्या जाळ्यात हरिण अडकले. कोल्ह्याला आनंद झाला. आता हरीण मेले की तो खाणार होता.
कावळा म्हणाला,
“तू मेल्यासारखा पडून राहा. मी सोडवतो तुला. मी काव, काव केलं की तू पळ. काळजी करू नकोस.”
शेतकरी आला. मेलेले हरीण बघून त्याने जाळे उघडले. कावळ्याने काव, काव केलं आणि हरीण जोरात पळाले. शेतकर्‍याने त्याच्या अंगावर दंडुका भिरकावला पण तो लागला कोल्ह्याला. कोल्हा मेला. हरिणाला आपला खरा मित्र कोण ते समजलं.
कावळा आणि हरीण जंगलात आनंदाने राहू लागले.

२२ मार्च
मुळाक्षरं आणि बाराखडीची उजळणी.
सांगितलेलं अक्षर ओळखून दाखविणे.
सावलीची गोष्ट.
एक मुलगी सकाळी शाळेत जाते तेव्हा सावली बरोबर असते. दुपारी नसते. संध्याकाळी पुन्हा सावली येते. मुलगी खेळायला जाते. त्यातील सकाळ, दुपार, संध्याकाळ असे शब्द.
गोष्ट ऐकल्यावर त्यावर विचारलेल्या प्रश्नांना पूर्ण वाक्यात उत्तर.

१५ मार्च
मुळाक्षरं आणि बाराखडीची उजळणी.
दिलेल्या अक्षरांवरून शब्द सांगणे.
शाळा, सुटी, कंटाळा या श्ब्दांवरून वाक्य तयार करणे.

८ मार्च 
खा, जा, गा या क्रियापदांचा तिन्ही काळात वापर.
मी जाते, मी खाते, मी गाते
मी गेले, मी खाल्लं, मी गायले.
मी जाईन, मी खाईन, मी गाईन.
झाड या शब्दावरुन प्रत्येकाने तीन वाक्य सांगणे.
लहान माझी बाहुली कविता.

१ मार्च 
गाळलेल्या जागेतील अक्षरं सांगणे.
आई दुकान ( ) गेली. तिने म( ) खाऊ घेतला. ती गाडी( ) बसली. खिडकी( ) हात बाहेर काढू नको ( ) आम्ही ( ) आलो. मी खाऊ ( )
आई दुकानात गेली. तिने मला खाऊ घेतला. ती गाडीत बसली. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. आम्ही घरी आलो. मी खाऊ खाल्ला.
दाखवलेल्या गोष्टी काय आहेत ते सांगणे. उदा. केळं, सफरचंद. त्या त्या गोष्टीवरुन वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात वाक्य तयार करणे. उदा. मी केळं खाते, मी केळं खाल्लं, मी केळं खाईन. मी आणि आम्हीचा वापर करुन तिन्ही काळात बोलणे.
गोष्ट – कंटाळा. त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात देणे.
लेखन, वाचन.


फेब्रुवारी २०२०

२३ फेब्रुवारी
मी, आम्ही, तू, तुम्ही, ते, ती, तो, तू याचा वापर करुन वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळा, अपूर्ण वर्तमान, भूत, भविष्यकाळात वाक्य.
उदा. मी खेळत आहे, मी खेळलो. मी खेळेन मी खेळणार आहे, मी खेळत होतो, मी खेळलो.
चित्र पाहून वाक्य करणे – राजू दात घासत आहे. राजू खेळत आहे, राजू केस विंचरत आहे, राजू फूटबॉल खेळत आहे, राजू झोपला आहे. राजू उठून खिडकीतून पाहत आहे. ही सर्व वाक्य आम्ही वापरुन करणे.
चित्रातल्या गोष्टी मराठीत सांगणे – घसरगुंडी, झोपाळा, रोप, रोपटी, झाड, झाडे, कपाट.
लेखन, वाचन.

१६ फेब्रुवारी
शून्य ते झीरोचा प्रवास, निर्मिती याबद्दल माहिती.
दिनदर्शिकेबद्दल माहिती. अधिकमास म्हणजे काय, त्यातील तारखा ओळखणे इत्यादी माहिती.
शब्दवाचन.

९ फेब्रुवारी 

खेळकर ससे गोष्ट:
एक जंगल होते. त्या जंगलात एक नदी होती. नदीला खूप पाणी असायचं. नदीच्या काठावर तीन ससे खेळत. एक हत्ती पाणी प्यायला यायचा. हत्तीची आणि सशांची मैत्री झाली. एकदा अचानक वाघ आला. त्याची डरकाळी ऐकून ससे घाबरले. हत्तीने त्यांना युक्ती सांगितली.
वाघ सशांवर धावून आला पण तेवढ्यात हत्तीने त्याच्या सोंडेतलं पाणी वाघावर उडवलं. वाघ गोंधळला. सशांनी टुणकन उडी मारली आणि ते हत्तीच्या पाठीवर बसले. हत्तीने सशांना पलिकडच्या काठावर नेऊन सोडले.

संगीत खुर्ची खेळ. खेळताना गवताचं पातं वार्‍यावर डोलतं कविता म्हणणे.

चित्रावरुन सण ओळखणे.
रंग आणि आकार.
अवयव सांगून त्याचं लिंग सांगणे. अनेकवचन सांगणे :
हा/तो – हे/ते
केस – केस, कान – कान, गाल – गाल इत्यादी.

२ फेब्रुवारी 

गोष्ट
दोन मांजरं होती. रस्त्यात दोघांना एक केक दिसला. एका मांजराने तो केक उचलला. दुसरं मांजर केक ओढायला लागलं. दोघांचं भांडण सुरु झालं. तेवढ्यात रस्त्यावरुन एक माकड जात होतं. दोघांनी त्याला भांडण मिटवायला सांगितलं. माकड म्हणालं,
“मी केकचे दोन भाग करतो आणि तुम्हाला देतो.” माकडाने केकचे दोन भाग केले. माकड खूष झालं नाही.
“एक भाग मोठा आहे.” ते नाराजीने म्हणालं. मोठा भाग त्याने थोडासा खाल्ला.
“अजूनही दोन भाग सारखे नाहीत.” माकड पुन्हा नाराजीने म्हणालं. माकडाने आणखी थोडा केक खाल्ला. असं करत शेवटी अगदी छोटे कण शिल्लक राहिले.
“एवढासा केक तुम्ही कसा खाणार?” त्याने मांजराना विचारलं आणि पटकन सगळा केक खाल्ला. मांजरं माकडाकडे बघत राहिली. माकड हसत हसत निघून गेलं.
दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ झाला.

प्रश्न – मांजर किती होती? दोघांना रस्त्यात काय दिसलं? दोघांचं भांडण कशावरुन झालं? माकडाला मांजरांनी काय सांगितलं? माकडाने काय केलं?
उत्तरं पूर्ण वाक्यात देणे. किती, काय, कशावरुन या शब्दांच्या जागी उत्तर द्यायचं, बाकी वाक्य तसंच राहतं हे लक्षात ठेवणे.

समुद्रावर जाताना कोणत्या गोष्टी नेतात ते सांगणे.

वाचन, लेखन.


जानेवारी २०२०

२६ जानेवारी 
प्रजासत्ताक दिनांबद्दल माहिती. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यामधील फरक. घटना, राज्यघटना, संविधान, कवायत अशा शब्दांचे अर्थ.
वाक्यांमध्ये अव्यय वापरणे.
भरत नाव राजा होता. तो नावामुळे भारत नाव. – भरत नावाचा राजा होता. त्याच्यामुळे भारत नाव आहे.
भरत राजा पाच मुले होती – भरत राजाला पाच मुले होती.
एका मुला नाव – एका मुलाचे नाव
मला शाळा आवडते. मला माझी शाळा आवडते. ही वाक्य, मी, मला, माझे, तू, तुला, तुझे, ती, तो, ते, आम्ही, आपण, आपल्याला वापरुन सांगणे.
I like school, I go to school – मला शाळा आवडते, मी शाळेत जाते/जातो. दोन्हीकडे I साठी वेगवेगळे (मला, मी) शब्दप्रयोग का केलेला आहे त्याचा मुलांनी विचार करुन सांगणे.

१९ जानेवारी 
चित्र ओळखणे.
घड्याळ उजळणी
तान्हाजीची गोष्ट. त्यातील शब्द.
त्या.. आई…खाऊ..दि अशा प्रकारची वाक्य गाळलेले शब्द भरुन पूर्ण करणे. – त्याच्या आईने खाऊ दिला.
त्याला आईने खाऊ दिला.
लेखन, वाचन

१२ जानेवारी 
शब्दांमधील मूळ अक्षरं ओळखणं. जसं – सुमेधा – स, म, ध.
घड्याळातील सव्वा, साडे, पावणे सांगणे. उदा. सव्वातीन, साडेचार, पावणेपाच
गवताचं पातं वार्‍यावर डोलतं ही कविता म्हणून दाखविणे. पाठ करणे. कवितेतील शब्दांचा अर्थ सांगणे, समजून घेणे.
कौरव – पांडव गोष्ट. पांडवांची नावं, एकलव्याची गोष्ट.
लेखन, वाचन.

५ जानेवारी 
Reya, suti, zop. Aanaya, rasta, kutra, mar. Aaroha, mitra, khel. Raghav, aai, dukan, kharedi. या वाक्यात ने, बरोबर, च्या, ला, ले, चा वापर करुन मराठीत पूर्ण वाक्य सांगणे.
ते दार – ती दारं/दारे, ते पुस्तक – ती पुस्तकं/पुस्तके, ते चित्र – चित्रं/चित्रे, ते पान – ती पाने. अशा शब्दांचं लिंग ओळखणे. एकवचन आणि अनेकवचन वापरुन वाक्य तयार करणे.
कौरव आणि पांडव, गुरुभक्त एकलव्य या गोष्टी. रामायण, महाभारत काय आहे याबद्दल थोडीशी माहिती. गोष्टींवरील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरं देणे.
लेखन.


डिसेंबर २०१९

२९ डिसेंबर 
योग्य जोड्या जुळवणे
दात – खा
दार – काढा
खाऊ – उघडा
कचरा – घासा
वाक्याचा प्रकार – आज्ञार्थी

चित्रावरुन वाक्य/गोष्ट सांगणे
मधुला सापडला फुगा. हिरवा, पिवळा फुगा. मधु हातात धरुन धावू लागला. वारा आला. फुगा हातातून सुटला. हवेत गेला. झाडावर अडकला. वानर आला. वानराने फुगा हातात धरुन दाबला. फुगा फुटला. वानर घाबरला. धूम पळाला. मधु खुदूखुदू हसला.

१५ डिसेंबर 
१ ते २५ आकडे म्हणणे, लिहिणे
घड्याळ उजळणी – सव्वा, दीड, पावणे
मोठा गट – अकारान्त शब्द एकवचन व त्याचं अनेकवचन नियम. घर – घरे, दार – दारे इत्यादी.
गोष्ट वाचन – विचारलेल्या प्रश्नांना पूर्ण वाक्यात उत्तर देणे.
चालणे, चढणे, खोडणे, निवडणे, ठेवणे, धुणे, विसरणे हे शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग.
लेखन

८ डिसेंबर 
घड्याळ उजळणी – सव्वा, साडे, पावणे शिकणं. उदा. सव्वा सहा, साडेसहा, पावणेसात…
सर्व वाक्य भूतकाळ आणि भविष्यकाळात ’आम्ही’ वापरुन सांगणे. उदा. आम्ही रडलो, आम्ही रडू.
पोहणे, हसणे, गाणे, नाचणे, धावणे, पळणे या क्रियापदांचा वापर.
गवताचं पातं वार्‍यावर डोलतं हे गाणं संगीतखुर्ची खेळत पाठ करणे. त्यातील शब्दांचा अर्थ.
वाचन, लेखन.

१ डिसेंबर 
घड्याळ – सव्वा, साडे, पावणे शिकणं. उदा. सव्वा सहा, साडेसहा, पावणेसात…
इंग्रजी वाक्यांचं भाषांतर – उदा. – They are stupid, They are smart, They are tall, They are short…
नपुंसकलिंगी शब्द आणि त्यांचं एकवचन – ते घर – ती घरं, ते नाक – ती नाकं, ते दार – ती दारं, ते घड्याळ – ती घडयाळं, ते पेन – ती पेनं.
टिपूची गोष्ट भाग ३ – ४ – विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरं.
वाचन, लेखन.


नोव्हेंबर २०१९

१७ नोव्हेंबर 
कागदावर लिहिलेले शब्द वाचणे. त्यावरुन गोष्ट तयार करणे.
घड्याळ – सव्वा, साडे, पावणेची ओळख.
टिपू गोष्टीतील काही भाग.
लपाछपी – खेळताना बोललेल्या वाक्य, शब्दांचं भाषांतर.
१ ते २५ आकडे.

१० नोव्हेंबर
ने, ला, च्या इत्यादीचा वाक्यातील मोकळ्या जागेत उपयोग करणे.
ती साबण चेहरा धुतला – तिने साबणाने चेहरा धुतला.
ती आई टॉवेल दिला – तिला आईने टॉवेल दिला.
ती डोकं आंघोळ केली – तिने डोक्यावरुन आंघोळ केली.
ती टॉवेल केस पुसले – तिने टॉवेलने केस पुसले.
ती केस सुकले – तिचे केस सुकले.
वरील सर्व वाक्य भूतकाळात आहेत. सर्व वाक्य वर्तमानकाळात सांगणे.

टिपूच्या गोष्टीतील काही भाग आणि शब्दांचा अर्थ. टिपूच्या गोष्टीतील वाक्याचा काळ सांगणे.
वाचन, लेखन.

३ नोव्हेंबर 
मराठी कविता – गवताचं पातं वार्‍यावर डोलतं. या कवितेवर संगीत खुर्ची. कवितेतील सर्व शब्दांचा अर्थ. – पाखरु, पातं, फांद्या, आंबा इत्यादी.
अति तिथे माती आणि पालथ्या घड्यावर पाणी या म्हणींचा अर्थ आणि मुलांनी यावरुन प्रसंग सांगणे/ प्रवेश करणे
इंग्रजी वाक्यांचं मराठीत भाषांतर करणे I come, I am coming, I was coming, I will come इत्यादी.
वाचन, लेखन.