मासिक वर्ग ( Once a month)

२१ जून २०२०

अर्थ सांगून विरुद्धार्थी शब्द सांगणे. लिहिणे.
यश – यशस्वी, अपयश – अपयशी
जय – पराजय
आशा – निराशा
खरं – खोटं
प्रामाणिक – अप्रामाणिक

शेजारी, अनय, रस्ता, कुत्रा, काठी, मार या शब्दांवरुन वाक्य तयार करणे.
रस्त्याच्या शेजारी अनयने कुत्र्याला काठीने मारलं.
अनयने शेजारच्या कुत्र्याला रस्त्यावर काठीने मारलं.
अनयने रस्त्याच्या शेजारी कुत्र्याला काठीने मारलं.
शेजारच्या अनयने रस्त्यावरच्या कुत्र्याला काठीने मारलं.

व्याकरण:
वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यात जो बदल होतो त्याला विभक्ती म्हणतात. ते करण्यासाठी जी अक्षरं वापरतात त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात.

१७ मे २०२०

व्याकरण नियम. 
अकारान्ताच्या अगोदरचे इकार व उकार दीर्घ असतात.
एकाक्षरी शब्दातील इकार आणि उकार दीर्घ असतात.

मुलांनी चुकीचं लिहिलेलं दुरुस्त करणे.
माजे वडिल बाजारात गेले – माझे वडील बाजारात गेले.
मि खीर प्यायले – मी खीर प्यायले.
मि वकिल आहे – मी वकील आहे.
मि आणि माजी आई गरिब आहोत – मी आणि माझी आई गरीब आहोत.
मराटी कूप कठिण आहे – मराठी खूप कठीण आहे.

वरील नियम वापरून मुलांनी गोष्ट तयार करणे.
तू एक राक्षस आहेस. त्या राक्षसाला खायला खूप आवडतं/आवडते. तो राक्षस खीर खातो. मी त्या राक्षसाबरोबर खीर खाते. खीर खाणार्‍या राक्षसाने मला खाल्लं. मी राक्षसाच्या पोटात खीर खाल्ली.

२२ मार्च
नियम – अकारान्त शब्दाच्या आधीचं अक्षर दीर्घ असतं – कठीण, पूस, धूर, धूळ, खूप, दूर इत्यादी.
लेखन – धूर झाला, खूप धूर झाला, तू पाय पूस
एकाक्षरी इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घ असतात – मी, ही, ती, तू, धू, पू
लेखन – तू हात धू, तू पाय धू, तू दूर गेलीस इत्यादी.
दोन्ही नियम प्रत्येकाने सांगणे.
रफार नियम आणि शब्द.
सर्व, कर्म, धर्म
सार्‍यांना, वार्‍यावर, थार्‍यावर
राष्ट्र, ट्रम्प
क्रम, भ्रम, व्रण

१ मार्च २०२०
प्रत्येकाने पुस्तकातील उतारा वाचून दाखविणे.
चित्रावरुन वाक्य लिहिणे. उदा. दूधवाल्याने दूध आणलं. मांजर भांडं घेऊन आलं. भांडं पडलं. मांजर पळालं.
व्याकरण नियम.
आकारान्त पुल्लिंगी शब्दांचं अनेकवचन एकारान्त होतं. – घोडा – घोडे, कुत्रा – कुत्रे, आंबा – आंबे, ससा – ससे.
पुल्लिंगी असलेल्या पण आकारान्त नसलेल्या शब्दांचं अनेकवचन तेच राहतं – देव – देव, उंदीर – उंदीर, लाडू – लाडू.

१९ जानेवारी २०२०
बदललेल्या संख्यावाचन पद्धतीवर you tube वरील मंगला नारळीकर यांचं भाषण पाहणे. काय समजलं ते सांगणे.
तान्हाजी वंशज – चित्रफित पाहून काय समजलं ते सांगणे.
चित्रावरुन वाक्य तयार करुन ती लिहिणे.

१५ डिसेंबर २०१९
नाम आणि त्याचे लिंग ओळखणे
ते घर दगडी आहे. ती घरे दगडी आहेत.
हे फूल जांभळे आहे. ही फुले जांभळी आहेत.
हे घड्याळ बंद आहे. ही घड्याळे/घड्याळं बंद आहेत.
नाम – घर, फूल,  घड्याळ – नपुंसकलिंगी.
नियम – अकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. नपुंसकलिंगी शब्द सांगून त्याचं अनेकवचन तसंच वाक्यात रुपांतर करणे. (दार, पुस्तक इत्यादी)

झाडावर एक पाखरु आहे. झाडावर दहा पाखरे आहेत.
आईने एक लिंबू आणलं. आईने दहा लिंबे/लिबं आणली.
डोळ्यातून एक आसू आला. डोळ्यातून आसवे आली.
नियम – उकारान्त आणि ऊकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. क्वचित प्रसंगी ते वेकारान्त होते.

वाचन आणि नविन शब्दांचे अर्थ.


१७ नोव्हेंबर २०१९
वाचन.
जोडाक्षर लेखन.
क्रम, ट्रम्प यासारख्या शब्दांमधील ’र’ कुठे आणि का द्यायचा याबाबत स्पष्टीकरण आणि तशा शब्दांचं लेखन, वाचन.
व्याकरण उजळणी:
मी, ही, तू, धू, पू – इकारान्त आणि उकारान्त एकाक्षरी शब्द दीर्घ असतात.
मूल, पूल, धूर, पूर – अकारान्त शब्दांच्याआधी येणारं अक्षर दीर्घ असतं. अपवाद – गुण, कारण संस्कृत शब्द जसेच्यातसे मराठीत येतात.
मुलाला, पुलावार, धुराने, पुरामुळे – शब्दाचं स्वरुप प्रत्यय जोडल्यावर बदलतं.


२०ऑक्टोबर २०१९
पडणे, थोडावेळ पडणे, तोंडघशी पडणे, डोक्यावर पडणे, पड खाणे यांचा वेगवेगळ्या वाक्यात वापर करुन लिहिणे.
पुस्तकातला उतारा वाचणे.
वर्गातील प्रेमळ भूत गोष्ट ऐकणे.
व्याकरण नियम उजळणी.


२२ सप्टेंबर २०१९
 हार मानणे, पत्करणे, खाणे, हार घालणे या सर्वांचा वाक्यात वापर करुन लिहिणे

व्याकरण नियम:
इकारान्त किंवा उकारान्त एकाक्षरी शब्द दीर्घ असतात. उदा. मी, ही, ती, तू, पू, धू.
अकारान्त शब्दांच्या अलिकडचं अक्षर दीर्घ असतं. उदा. धूर, पूर, मूल, कठीण, वाईट.