आंतरजालीय वर्ग (Online Class)

गाळलेल्या जागा खालील शब्द वापरुन भरणे. लिहिणे, वाचून दाखविणे.
भिंतीवर, भिंत, अंगणात, अंगण

मी — खेळत होतो –  मी अंगणात खेळत होतो.
माझ्या घरासमोर — आहे – माझ्या घरासमोर भिंत आहे.
त्या — मी डोकं आपटलं – त्या भिंतीवर मी डोकं आपटलं.
— तुटून पडली – भिंत तुटून पडली.

शा/श्या चा वापर
डोसा – डोशाची चटणी
मासा – माशाची आमटी
ससा – सशाचे कान धर
माशी – माश्या आल्या
बशी – बश्या ठेव
उशी – उश्या उचल.

नियम – अकारान्त शब्दाच्या आधीचं अक्षर दीर्घ असतं – कठीण, पूस, धूर, धूळ, खूप, दूर इत्यादी.
लेखन – धूर झाला, खूप धूर झाला, तू पाय पूस.
एकाक्षरी इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घ असतात – मी, ही, ती, तू, धू, पू
लेखन – तू हात धू, तू पाय धू, तू दूर गेलीस इत्यादी.
दोन्ही नियम  सांगणे.
रफार नियम आणि शब्द.
सर्व, कर्म, धर्म
सार्‍यांना, वार्‍यावर, थार्‍यावर
राष्ट्र, ट्रम्प
क्रम, भ्रम, व्रण

रफार वापर, काळांचा वाक्यात उपयोग.
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या डोक्यावर रफार काढतात. उदा. सूर्य, पूर्व, कर्म, धर्म. असे सांगितलेले शब्द लिहून दाखविणे.
ट ची बाराखडी लिहून दाखविणे.
दाखविलेल्या चित्रात काय घडत आहे ते वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळात सांगणे.
उदा. राजू दात घासतो, राजू दात घासतो आहे/घासतोय, राजू दात घासेल.
मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते या सर्वनामांचा वापर करुन वाक्य सांगणे.
लिहिलेले शब्द वाचणे.

शब्दांचं एकवचन – अनेकवचन. नियम. काळ.
 मी  चित्र काढतो.  मी चित्रं काढतो.
आम्ही रोप (Plant) लावतो. आम्ही रोपं लावतो.
तू  पेनाने लिहितोस. तू  पेनांनी लिहितोस.
तुम्ही दार लावता. तुम्ही दारं लावता.
तो पुस्तक वाचतो. तो पुस्तकं वाचतो.
ती झाड तोडते. ती  झाडं तोडते.
ते नख कापतात. ते नखं कापतात.
चित्र, रोप, पेन, दार, पुस्तक, झाड, नख – नाम (Noun)
मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते – सर्वनामं (pronoun)
काढणे, खाणे, लिहिणे, लावणे, वाचणे, तोडणे, कापणे – क्रियापदं (Verb)
काळ – वर्तमानकाळ. शब्द – नपुंसकलिंगी.
अकारान्त नपुंसकलिंगी नामाचे (Noun) अनेकवचन एकारान्त होते.चित्र, रोप, पेन, दार, पुस्तक, झाड, नख – चित्रे, रोपे, पेने, दारे, पुस्तके, झाडे, नखे.
बोलताना चित्रं, रोपं, पेनं, दारं, पुस्तकं, झाडं, नखं असं म्हणतात पण लिहिताना चित्रे, रोपे, पेने, दारे, पुस्तके, झाडे, नखे असं लिहितात.