शाळेबद्दल

देश तसा वेश ही उक्ती भाषेबद्दलही स्वीकारत जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपण आपली आणि मुलांची मुळं रुजवतो.  त्याचवेळी संस्कृती आणि मातृभाषेची नाळ तुटू न देण्याचाही प्रयत्न करतो. घरात मराठी आणि बाहेर इंग्रजी हे सहजसाध्य आहे. संशोधनातूनही सिद्ध झालं आहे की बहुभाषिकत्वाने आकलनाची, अडचणी सोडवण्याची, संवाद साधण्याची, समजून घेण्याची क्षमता कितीतरी पटीने वाढते.

ऑगस्ट २०१५ पासून मोहना आणि विरेनच्या घरी (9836 Ardrey woods dr. Charlotte, NC 28277) दर रविवारी मुलांचा दंगा – मस्ती आणि आरडाओरडा घुमतो मराठीतून. खो-खो, कबड्डी सारखे खेळ खेळतात.शिकता शिकता स्वत:च गोष्टी तयार करतात, शब्दांची अंताक्षरी खेळतात, प्रवेश सादर करतात. मुलांच्या मनातली मराठी बोलण्याची भीड खेळ, प्रवेश या प्रयोगांनी कमी झालेली जाणवते.

शिकू आनंदे:
क्रम: अक्षर ओळख, उच्चार, संभाषण, वाचन, लेखन.
शिकवण्याची पद्धत: खेळांमधून संवाद (हसत खेळत शिका पद्धत). संभाषण जमण्यासाठी जोड्या  करुन मुलांना वेगवेगळे विषय देऊन गटाने प्रवेश सादर करणे यावर भर. गोष्टी आणि वेगवेगळ्या खेळांमधून नवीन शब्दांची ओळख.
गृहपाठ: नाही.
स्वत:बरोबर आणायचं: वही, पेन्सिल, खोडरबर आणि उत्साह :-).


“When in Rome …” is what we have accepted with English and let our kids do the same. But at some point, we realize this and start getting pulled towards our core Marathi roots. Research shows bilinguals can quickly grasp new vocabulary, can resolve problems quickly, and develop good listening and socialization skills.

Since 2015, We are running the ‘Marathi Shala’ in South Charlotte (Ballantyne area). ‘Shala’ is not a typical classroom. Kids are encouraged to learn Marathi through games, skits, stories, or even chatting with each other. With Marathi skits and games, we’ve seen the confidence level grow. Interest increases by learning Marathi with others at the same level, which in turn has helped them to strive for more challenges.

Learn with Fun:
Order: communication, pronunciation, reading, and writing.
Teaching Technique: Learning through fun and games.
Homework: None.
What to bring: Notebook, pencils, erasers, and enthusiasm! 🙂